PHOTOS : न्यूज18च्या आयरिल अवाॅर्ड्समध्ये 'सेक्रेड गेम्स'ची धूम

सध्या जमाना आहे वेब सीरिजचा. त्यासाठीच न्यूज18नं आयरिल अॅवाॅर्डचं आयोजन केलं होतं. आणि सर्वात जास्त पुरस्कार मिळवून गेली सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज. या सीरिजनं 5 पुरस्कार पटकावले. पुष्पवल्लीला सर्वोत्कृष्ट विनोदी सीरिजचा पुरस्कार मिळाला. सुमुखी सुरेशनं हा पुरस्कार पटकावला.

या पुरस्कारात मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटावा असं घडलं. सेक्रेड गेम्ससाठी जितेंद्र जोशीनं सहाय्यक अभिनेत्यासाठीचा पुरस्कार मिळवला. नवाजुद्दीनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पुरस्कार मिळाला. सेक्रेड गेम्समध्ये नवाजची बायको बनलेली राजश्री देशपांडेही उपस्थित होती. सेक्रेड गेम्सची स्टार सुरवीन चावला सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. करण वाहीच्या सेक्रेड गेम्समधल्या ड्रग अॅडिक्ट तरुणाच्या भूमिकेचंही कौतुक झालं.

Trending Now