PHOTOS : भारतात iPhone होऊ शकतो बंद ?

ट्रायने आयफोन युजर्ससाठी डू-नॉट-डिस्टर्ब (DND) ऍपचे नवे वर्जन DND 2.0 ऍप डिजाइन केले आहे. मात्र, ऍपलने अद्याप त्याचा समावेश आपल्या प्लेस्टोअर यादित केलेला नाही. फेक कॉल्स आणि स्पॅम मैसेजेसवर रोकण्यासाठी टेलीकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायने दुरसंचार कंपन्यांसाठी नवी नियमावली तयार केली आहे. माहीती अशी आहे की, ऍपलसोबत सुरू असलेल्या टेक्नोसॅव्ही युद्धात ट्राय ऍपलविरु आणखीन कठोर पावले उचलण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, ट्राय एयरटेल, वोडाफोन सारख्या कंपन्यांविरुद्ध नोटिस जाहिर करुन ऍपलचे रेजिस्ट्रेशन रद्द करू शकते.  वास्तविक पाहता, ऍपल आणि ट्राय याच्यात डू-नॉट-डिस्टर्ब (DND) या ऍपवरूनच शितयुद्ध सुरू आहे. आयफोन यूजर्सचे फेक कॉल्स आणि स्पॅम मैसेजेस फिल्टर करण्यासाठीच ट्रायने डू-नॉट-डिस्टर्ब (DND) ऍपचे नवे वर्जन DND 2.0 ऍप डिजाइन केले आहे. त्याचा समावेश ऍपलने आपल्या प्ले-लिस्टमध्ये करावा असे ट्रायचे म्हणणे आहे. परंतू ऍपलचे म्हणणे आहे की...

  ट्रायचे म्हणणे आहे की, देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांनी येत्या 6 महिन्यात त्यांच्या नेटवर्कवर सर्व रेजिस्टर्ड डिवाइसवर डू-नॉट-डिस्टर्ब (DND) ऍप 2.0 वर्जन वापरावे. त्यासाठी त्यांनी ट्रायकडे रितसर परवानगी मागावी. अन्यथा त्यांचे टेलिकॉम नेटवर्क चे रेजिस्ट्रेशन रद्द केले जाईल. तुर्तास, डू-नॉट-डिस्टर्ब (DND) ऍपचे 2.0 वर्जन केवळ एंड्रॉयड यूजर्ससाठीच उपलब्ध आहे. पण, जर ऍपलने ट्रायला नकार दिल्यास ऍपलचे टेलिकॉम नेटवर्क (3G/4G) चे रेजिस्ट्रेशन रद्द होऊ शकतं.

Trending Now