'विराट सेना' २९२ मध्येच तंबूत परतली

इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या पाचव्या कोसोटीतील पहिल्या डावात इंग्लंडने भारतासमोर ३३२ धावांचे लक्ष ठेवलं होत. पण तिसऱ्या दिवसाखेर भारताला २९२ धावांपर्यंतच मजल मारता आली. दुसऱ्या दिवशी भारताची सुरुवात थोडी फिकी झाली होती. दिवसाखेरीस भारताने १७४ धावा करुन ६ विकेट्स गमावल्या होत्या. इतर खेळाडूंच्या तुलनेत विराट थोडं चांगलं खेळत होता पण त्याला ही ४९ धावात बेन स्ट्रोक्सने आऊट केले.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मात्र हनुमा विहारीने ५६ तर रविंद्र जडेजाने ८६ धावा ठोकल्या. त्या दोघांच्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाला २९२ धावांपर्यंत मजल मारता आली. Association Stadium, Mohali, India - 28/11/16. India's Ravindra Jadeja celebrates his half century. REUTERS/Adnan Abidi

Trending Now