भांगडा पाहून फलंदाजीला गेला दिनेश कार्तिक, पहिल्याच चेंडूत झाला आऊट

भारतीय क्रिकेट टीम सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. टी- २०, एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ कसोटी मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार. १ ऑगस्टपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. इंग्लंड आणि भारतादरम्यान सराव सामना खेळण्यात येत आहे. या सामन्यात मुरली विजय (५३), केएल राहुल (५८) ही सलामीची जोडी लवकर बाद झाली. यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली (६८) आणि दिनेश कार्तिकने पहिल्या दिवसाचा खेळ सांभाळण्याचा प्रयत्न केला. दिवसाअखेरीस कार्तिक ८२ धावांवर नाबाद राहिला.

दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरूवातीला खेळाडूंचे भारतीय पद्धतीने मैदानात दमदार स्वागत करण्यात आले. यावेळी पंजाबी भांगड्यामध्ये दिनेश कार्तिक इतर खेळाडूंसोबत मैदानात उतरला. दिनेशला हा भांगडा एवढा आवडला की, त्याचे पूर्ण लक्ष तिथेच लागले असे वाटते. आता तुम्ही म्हणाल की, कार्तिकच्या क्रिकेटचा आणि भांगड्याचा काय संबंध? त्याचे झाले असे की, मैदानात उतरताना दिनेशला भांगड्याचे संगीत एवढे आवडले की आपसुक त्याच्या चेहऱ्यावर त्या संगीताचा आनंद दिसत होता. वॉल्टरच्या पहिल्याच चेंडूत डिक्सनने कार्तिकचा झेल पकडत त्याला बाद केले.  भांगड्यामुळे तो खेळावर लक्ष केंद्रीत करु शकला नाही, अशा धाटणीच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. भांगड्यामुळे दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच चेंडूत तो बाद झाला. पहिल्या चेंडूवर बाद झाल्यामुळे सध्या त्याला ट्रोल केले जात आहे. आपल्या ध्येयावरून लक्ष विचलीत झाल्यावर काय होतं याचाच अनुभव त्याने आज घेतला.

Trending Now