PHOTOS : रेल्वे चाॅर्ट तयार झाल्यावरही मिळू शकते कन्फर्म तिकीट !

रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर देखील मोबाईलमध्ये तुम्ही कन्फर्म तिकीट मिळवू शकता..होय, हे शक्य आहे. चार्ट तयार झाल्यानंतर ज्या ट्रेनमध्ये सीट खाली राहतात, तिच्यात करंट बुकिंग सुविधेनं तुम्ही मोबाईलने सीट बुक करू शकतात. जर तुम्हाला तात्काळ कुठे बाहेरगावी जायचं असेल आणि तुमच्याकडे रेल्वेचे आरक्षित तिकीट नसेल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. भारतीय रेल्वेने नुकतीच एक नवीन सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे तुम्ही घरबसल्या आपलं तिकीट कन्फर्म करू शकता. या नवीन सुविधेनुसार तुम्ही रेल्वेचा चार्ट तयार झाल्यानंतर देखील तिकीट बुक करू शकता. आतापर्यंत करंट बुकिंगसाठी रेल्वेस्टेशनच्या काउंटरवर जावे लागत असे. परंतु, या नवीन सुविधेमुळे हे काम तुम्ही आपल्या मोबाईल मध्येच करू शकता. चार्ट तयार झाल्यानंतर देखिल ज्या ट्रेनमध्ये जागाखाली राहतात, त्यांना करंट बुकिंग फॅसिलिटीच्या माध्यमाने तुम्ही बुक करू शकता. हे तिकीट तुम्ही IRCTC Rail Connect App आणि IRCTC ची वेबसाईटच्या मदतीने बुक करू शकता.

IRCTC Rail Connect App मध्ये Current Avialble चा ऑप्शन चार्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला क्लास (ज्या श्रेणीमध्ये तुम्ही प्रवास करू इच्छिता) वर क्लिक केल्यानंतर येतो.5 जुलै 2018च्या करंट रिजर्वेशन सुविधेनुसार एकूण 40,781 तिकिटांची विक्री झाली, ज्या लोकांना तात्काळ बाहेरगावी कामानिमित्त जायचं आहे त्यांना हे सोईस्कर होणार आहे. IRCTC च्या वेबसाईटमध्ये एक नवीन फीचर देखिल समाविष्ट केले गेले आहे, ज्यात तुम्ही खिड़कीत खरेदी केलेले रिजर्वेशनचं तिकीट तुम्ही मोबाईलने रद्द करू शकता. याशिवाय, आता तुम्ही मोबाईलनेच जनरल तिकीट बुक करू शकता.

Trending Now