PHOTOS : लॅक्मे फॅशन वीकमध्ये आयोजकांनी केली हेमामालिनींची बोलती बंद

लॅक्मे फॅशन वीकमध्ये चर्चा होती ती शो स्टाॅपर हेमा मालिनी आणि ईशा देओल यांची. अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी लॅक्मे इंडिया फॅशनवीकमध्ये सहभाग घेतला.. आसाममधल्या विणकर महिलांनी ही साडी तयार केली आहे.. त्यांच्या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी हेमा मालिनी यांनी आसामच्या विणकरांनी विणलेली साडी परिधान केली होती. पत्रकारांशी संवाद साधताना हेमा मालिनी यांनी आपल्या लेकीच्या सिनेमाचं प्रमोशन सुरू केलं. ईशा केकवाॅक सिनेमातून कमबॅक करतेय. ही महिला शेफची गोष्ट आहे. हेमा मालिनी म्हणाल्या ईशाला बाळ झाल्यानं तिनं काही दिवस गॅप घेतली आणि आता ती पुन्हा परत आलीय.

खरं तर पत्रकारांनी ईशाला सिनेमाबद्दल प्रश्न विचारावे, असं हेमा मालिनी यांनी सुचवलंही. ईशाकडे माईक दिला आणि पहिल्याच प्रश्नावर आयोजकांनी आक्षेप घेतला. इथे फक्त लॅक्मे फॅशन शोबद्दल बोलायचं, सिनेमाबद्दल नाही, असं त्यांनी निक्षून सांगितलं. तशा दोघी मायलेकींना एकदम आॅकवर्डच वाटलं. पण मायलेकींचा हा रँपवाॅक टाॅक आॅफ द टाऊन ठरला, हे नक्की.

Trending Now