गुरुपौर्णिमेला 'या' कलाकारांनी पुजलं आपल्या 'या' गुरूंना!

आज गुरुपौर्णिमा. गुरूंचं पूजन करायचा दिवस. हिंदी-मराठी कलाकारांच्या करियरमध्ये एखादा गुरू असतोच. त्या गुरूमुळे त्यांच्या आयुष्याला गती मिळाली असते. अमिताभ बच्चन बाॅलिवूडचे शहेनशहा आपल्या आईवडिलांना गुरू मानतात. त्यांच्या आयुष्यातल्या बरेच महत्त्वाचे निर्णय आपल्या आईवडिलांना विचारून घेतलेत. राजकुमार राव हा शाहरूख खानला आपला गुरू मानतो. किंग खाननंही वेळोवेळी राजकुमार रावच्या सिनेमांचं ट्विटरवरून प्रमोशन केलंय. शाहरूखला गुरू मानूनही राजकुमार रावनं कधी किंग खानच्या अभिनयाची काॅपी केली नाही. सलमान खाननं हिरो सिनेमातून सूरज पांचोलीला लाँच केलं. तेव्हापासून प्रत्येक मुलाखतीत सूरज सलमान आपला गुरू असल्याचं सांगतोय.

अभिनेता स्वप्नील जोशीचे गुरू सचिन पिळगावकर आहेत, हे सर्वश्रुत आहे. अनेकदा स्वप्नील सचिन यांच्यासारखा अभिनयही करतो. रणांगण सिनेमात दोघांची जुगलबंदी पाहायला मिळाली. उर्मिला कानिटकरचं पहिलं प्रेम आहे नृत्य. आणि या नृत्यासाठीच ती नृत्यांगना फुलवा खामकरला आपला गुरू मानते.

Trending Now