बकरी ईदला किंग खानही देतो कुर्बानी

बकरी ईदच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी दिली जाते. आणि यात बाॅलिवूडचे सेलिब्रिटीजही मागे नाहीत. त्यांच्यासाठी चांगल्या प्रतीचे, महागडे बकरे मागवले जातात. यात शाहरूख खान आहे. तो दरवर्षी बकरी ईदला बंगळुरूहून बकरे मागवतो. मोहम्मद इब्राहिमनं डीएनएशी बोलताना सांगितलं की दर वर्षी तो शाहरूख खानला बकरा पाठवतो. तो खूप किमती असतो. गेल्या वर्षी जो बकरा किंग खानला हवा होता तो 5 लाखाचा होता.

दोन वर्षांपूर्वीही शाहरूखनं कर्नाटकाहून बकरे खरेदी केले होते. या बकऱ्यांसाठी त्यानं 1 लाख 10 हजार रुपये दिले होते. त्यांचं वजन 250 किलो होतं. सध्या किंग खान झिरो सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. सिनेमात शाहरूख बुटका बनलाय. त्याच्या सोबत कतरिना आणि अनुष्काही आहेत.

Trending Now