PHOTOS : सनी लिओनने केरळसाठी खरंच 5 कोटींची मदत केली का ?

केरळमध्ये महाप्रलयात जवळपास 350 जणांचा मृत्यू झाला. तर 2 लाखांहुन अधिक बेघर झाले आहे. असं म्हटलं जातंय की 100 वर्षातला हा सर्वात भयानक महाप्रलय होता. जगभरातून केरळसाठी मदतीचे हात पुढे आले. याच दरम्यान, बाॅलिवूड अभिनेत्री सनी लिओनने केरळच्या मदतीसाठी 5 कोटींची मदत दिली. ही बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली. जे अमिताभ बच्न आणि शाहरुख खानने केलं नाही ते सनीने करून दाखवलं. पण सनी आणि तिच्या टीमने याबद्दल दुजोरा दिला नाही. 'इंडिया टुडे'ने याबद्द सनी आणि तिचा पती डेनियल विचारणा केली असता त्यांनीही कोणतेही उत्तर दिले नाही.

तिच्या मॅनेजर इब्राहिमने सांगितलं की, आम्ही मदत तर दिली आहे पण ती आर्थिक स्वरूपात किती दिली याबद्दल माहिती देऊ शकत नाही. हा एक खासगी प्रश्न आहे. खरंतर सनी लिओनने 5 कोटींची मदत दिल्याचं सांगितलं जातंय.विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच सनीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली होती. यात तीने आपल्या मानलेला भाऊ हा किडनीच्या आजाराने त्रस्त आहे. त्याला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. तर चाहत्यांनी मदत करावी असं आवाहन केलं होतं. प्रभाकर हे सनी लिओनचे तिनं मुलं निशा, अशर आणि नोआचं पालन करताय. सनीने आपल्या पोस्टमध्ये प्रभाकर गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या चुकीमुळे त्याला किडनीचा आजार झाला. त्यामुळे त्याला किडनी ट्रान्सप्लाट करावे लागणार आहे. या उपचारात जास्त खर्च येत असतो.

Trending Now