PHOTOS : दहीहंडी उत्सावाला आयटम साँगचा तडका !

गोविंदा रे गोपाळा...गोविंदा आला रे...म्हणत मुंबईत दिवसभर थरांचा थरथराट पाहण्यास मिळाला. यासोबतच विविध ठिकाणी आयोजकांकडून सेलिब्रिटींना बोलवण्यात आलंय. तर काही ठिकाणी मराठी, हिंदी गाण्यावर दमदार परफाॅर्मन्सही पाहण्यास मिळाले.

हिंदी आयटम साँगवर नृत्यांगनांनी एकच धुराळा उडवून दिला. कुठे लैला ओ लैला गाण्यावर... तर कुठे चोली के पिछे क्या है गाण्यावर... एक करत अशा अनेक आयटम साँगवर नृत्यांगना थिरकल्या आणि गोविंदाही.... मग काय हे सगळं कायमचं कॅमेऱ्यात कैद करून घेण्याचा मोह कुणालाही आवरला नाही. पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची याच लावणीप्रमाणे नृत्यांगनांनी आपली कला सादर केली एकेकाळी गोविंदाला प्रोत्साहन देण्यासाठी पाण्याचा मारा आणि टाळ्यांचा गडगडात पुरेसा होता पण आता काळ जसा बदलला तसा स्वरूपही बदललं पाहण्यास मिळतंय. 

Trending Now