... म्हणून हरमनप्रीत कौरकडून काढून घेतली डीएसपीची नोकरी

चौकशीदरम्यान हरमनप्रीतने जी डिग्री दाखवली होती ती मेरठमधील चौधरी चरण सिंह युनिव्हर्सिटीतील होती असे सांगण्यात आले होते. पण वास्तवात मात्र त्या युनिर्व्हसिटीमध्ये तिच्या नावाची नोंदच नाही. त्यामुळे हरमनप्रीतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. भारतीय महिला टी- 20 ची कर्णधार कौरचे क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरी पाहून पंजाब पोलिसांनी तिला डीएसपीचे पद देऊ केले होते. पण तिची हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. हरमनप्रीतची ग्रॅज्युएशनची डिग्री खोटी निघाली. हरमनप्रीतची शैक्षणिक पात्रता आता फक्त 12 वी पास अशीच असणार आहे. पदवीधर नसल्यामुळे तिच्याकडून डीएसपीची रँक काढून घेण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ती 12 वी शिकलेली असल्यामुळे तिला कॉन्स्टेबलची नोकरी मिळू शकते.

भारतीय महिला टी- 20 टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरला एक मोठा झटका बसला आहे. पंजाब पोलिसांनी हरमनप्रीत कौरला दिलेली डीएसपीची रँक आता काढून घेतली आहे. यावर हरमनप्रीतच्या मॅनेजरने स्पष्ट केले की, पंजाब पोलिसांकडून कौरला डीएसपीच्या पदावरुन काढणारे कोणतेही पत्र अजून तिच्या हाती आले नाही. शिवाय हरमनप्रीतची डिग्री खोटी नसून खरीच आहे असे कौरच्या मॅनेजरने सांगितले.

Trending Now