PHOTOS : तुमची रास सांगेल चंद्रग्रहण शुभ आहे की अशुभ!

ज्योतिष्य शास्त्रात चंद्र ग्रहणाला फार महत्त्व आहे. १२ ही राशीवर त्याचा वेगवेगळा प्रभाव पडतो. शतकातील सर्वात जास्त काळ चालणारं चंद्र ग्रहण २७ जुलै रोजी होणार आहे. या चंद्र ग्रहणाचा प्रभाव पुढील ३० दिवसांपर्यंत तुमच्या राशीवर पडेल. ज्योतिष्य शास्त्रानुसार अशा १० राशी आहेत ज्यांवर चंद्र ग्रहणाचा अशुभ प्रभाव राहील. पाहुया कोणत्या राशी आहेत त्या... मेष - चंद्र ग्रहणाचा सर्वाधीक शुभ प्रभाव मेष राशीवर पडेल. मेष राशीच्या जातकांना नोकरी आणि व्‍यवसायात प्रगती होईल. वृषभ - या राशीवर चंद्र ग्रहणाचा कोणताच अशुभ प्रभाव पडणार नाही. उलट ते शुभच राहील. ग्रहणकाळात वृषभ राशीच्या जातकाला यश आणि धनलाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन - मिथुन राशिच्या जातकाला सावध रहण्याची गरज आहे. कारण हे ग्रहण आपल्यासाठी शुभ संकेत घेऊन आलेले नाही. खर्च वाढेल. आर्थिक गोष्टींबाबत अत्‍यंत सावध रहावे लागेल. महत्त्वाच्या कामकाजानिमित्त प्रवास करावा लागू शक्तो. त्यातून फायदा होण्याची शक्यता नगण्य आहे. कर्क - कर्क राशिच्या जातकांवर या ग्रहणामुळे आकस्मिक संकट येऊ शकतं. अपघातामुळे कर्क राशीच्या जातकाला नुकसान होऊ शकत. एखाद्या मोठ्या आजाराचे संकेत मिळू शक्तात. वाहन चलविताना अत्‍यंत सावधतेने चालवावे. सिंह - या राशीसाठी हे चंद्र ग्रहण बिलकुल शुभ नाही. सिंह राशीच्या जातकाला नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे घरगुती वाद होऊ शकतात. त्यामुळे सावधान रहा, आणि असे कोणतेच काम करू नका ज्यामुळे तुम्हाला धोका र्निमाण होऊ शकतो. कन्‍या - कन्या राशिच्या जातकांवर या ग्रहणाचा प्रभाव शुभ राहील. भाग्‍य तुमच्यासोबत आहे. आकस्मिक धन लाभाचा देखील योग आहे. साहस आणि आत्मविश्वास वाढेल. कुटुंबाचे सहकार्य आणि स्‍नेह मिळेल. तुळ - तुळ राशीच्या जातकाला हे ग्रहण शुभ नाही. यश प्राप्त करण्यासाठी तुला राशिच्या जातकाला पूर्विपेक्षा अधिक मेहनत करावी लागेल. घरगुती जीवनात समस्या वाढू शक्तात. आरोग्याची काळजी घ्या. कारण तुळ राशीच्या जातकांवर चंद्र ग्रहणाचा नकारात्‍मक प्रभाव पडण्याची अधिक शक्यता आहे. वृश्चिक - वृश्चिक राशिच्या जातकांसाठी देखील हे ग्रहण अशुभ आहे. अनेक समस्यांचा सामना त्याना करावा लागू शक्तो. आवश्यक कामांमध्ये उगाच अडथळे येतील. घरात क्‍लेश उत्पन्न होऊ हो शक्तो. वाद-विवादापासून स्वतःला वाचवा. धनु - व्यक्तिगत जीवनात समस्यांचा सामना करवा लागू शक्तो. कामात अनेक आव्हाहाने र्निमाण होतील. परिश्रम घेतल्यानंतर देखील त्याचे फळ मिळणार नाही. नोकरीत समस्या र्निमाण होतील. कायद्याच्या गोष्टींसाठी सावधानता बाळगा. मकर - या चंद्रग्रहणाचा तुमच्या वैवाहीक जीवनावर आणि नोकरीवर अशुभ प्रभाव पडू शक्तो. व्यवसायात समस्यांचा सामना करवा लागेल. कुंभ - या चंद्रग्रहणाचा अशुभ प्रभाव तुमच्या जीवनावर पडू शकतो. आर्थिक समस्या, स्वास्थ्य समस्या, र्निमाण होतील. धन प्राप्तिसाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. मीन - या चंद्र ग्रहणाचा परिणाम तुमच्या नोकरीवर पडू शकतो. अनावश्‍यक खर्च वाढेल. मेहनत कराल, पण फळ मिळणार नाही. सावधान रहा आणि कोणतिही अप्रिय स्थिती र्निमाण होऊ देऊ नका.

Trending Now