PHOTOS : 'ज्या' वास्तूमुळे घडला तुरुंगवास,तो पाहुन भुजबळ झाले भावूक

माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ ज्या प्रकरणामुळे गाजले त्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आज गेले होते. महाराष्ट्र सदनात फेरफटका मारत असता भुजबळ भावूक झाले. राष्ट्रवादीच्या दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशन निमित्त भुजबळ दिल्लीत आलेत त्यावेळी भुजबळ हे महाराष्ट्र सदनात आले. विशेष म्हणजे छगन भुजबळांसोबत समीर भुजबळ ही होते. भव्य ऐतिहासिक वास्तू बांधताना ज्यांनी त्या घडवल्या त्यांचे बळी घेतले जातात. या न्यायाने महाराष्ट्र सदन बांधतांना आमचाच बळी घेतला गेला अशी खंत भुजबळांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र सदनाची पाहणी करताना भुजबळ भावूक झाले. देशभरातले सर्वपक्षीय समर्थक दिल्लीत स्वागताला आले आहे. दिल्ली दौऱ्यात सत्तेतले विरोधातल्या सर्व मित्रांशी संवाद होईल. आम्ही पक्ष बदलणार या मीडियाने उठवलेल्या वावड्या आहे असंही भुजबळ म्हणाले. ओबीसी राजकारणात आम्ही कायमच सक्रिय आहोत असंही यावेळी भुजबळ म्हणाले.

Trending Now