ब्रिटनमध्ये भारतीयांनी रॅली काढून दिलं खालिस्तानवाद्यांना चोख उत्तर

Ajay Kautikwar
ब्रिटनमध्ये ट्रॅफ्लगर स्क्वेअरमध्ये खालिस्तान समर्थकांनी काढलेल्या रॅलीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीयांनीही रॅली काढून फुटीरतावाद्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. भारताचे तुकडे कधीही होणार नाहीत. सर्व भारतीय एक आहे. पंजाब हा भारतापासून कधीच वेगळा होणार नाही असे फलक सर्व नागरिकांनी घेतले होते. या रॅलीत महाराष्ट्रीयन नागरिकांनी ढोल ताशा घेऊन हजेरी लावली आणि भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

भारतीयांनी काढलेल्या या रॅलीत अनेक शीख संघटनांचाही सहभाग होता. काही मुठभर लोकच खालिस्तानची मागणी करतात ते सर्व शिखांचं मत नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली. ज्यांना स्वतंत्र खालिस्तान पाहिजे त्यांनी आधी पंजाबमध्ये जाऊन निवडणूक लढावावी आणि आपली ताकद दाखवावी असं आवाहनही त्यांनी दिलं. 'वुई स्टॅण्ड वुईथ इंडिया' या संगठनेनं या रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. 

Trending Now