सोशल स्टार प्रिया वारियरला जाहिरातींच्या बंपर ऑफर्स, एका जाहिरातीसाठी मिळणार...

मुंबई, 13 जुलै : प्रिया वारियर... या नावातच प्रसिद्धी आहे असं म्हणायला हरकत नाही. काही क्षणात फक्त आपल्या हावभावांवर तिने अवघ्या जगाचं लक्ष स्वत:कडून ओढून घेतलं. भारतात नाही तर अवघ्या जगभरात तिचे चाहते आहेत. बरं मंडळी यात आश्चर्य म्हणजे प्रियाचा पहिला सिनेमा अजून रिलीज व्हायचा आहे. पण प्रिया त्याआधीच मोठी स्टार झाली आहे. आता या सगळ्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर जाहिरातींच्या ऑफर्सचा पाऊस पडतोय. सुरुवातीला जाहिराती करण्यासाठी तिने नकार दिला होता खरा पण आपली डिमांड पाहता तिने जाहिराती करण्यासाठी होकार दिला. हो आता यातून तिला भर भक्कम पैसे मिळणार हे नक्की.

आपल्या डोळ्यांचा अदाकारीने सगळ्यांना थक्क करणारी प्रिया ही एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी मुंबईमध्ये आली होती. सोशल मीडियावरून प्रसिद्धी मिळवणाऱ्या प्रिया प्रकाश वारियर सध्या वेगळ्याच विषयामूळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा आगामी 'उरू उदार लव्ह' या सिनेमातून ती प्रेक्षकांचा भेटीला येणार आहे. तिचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच तिला एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी चक्क १ करोड रुपये देण्यात आले आहे.

Trending Now