PHOTOS :नेहा धुपियाकडे 'गोड बातमी',3 महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

बाॅलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया अचानक लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आली. आपला मित्रा अंगद बेदीसोबत एका गुरुद्वाऱ्यात नेहाचा छोटेखानी लग्नसोहळा पार पडला. त्यानंतर अनेक अफवा पसरल्यात की ती गर्भवती आहे.

यावर नेहा आणि पती अंगदने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता खुद्द नेहानेच गोड बातमी दिलीये. नेहा धुपिया आई होणार आहे. नेहाने स्वत: ही बातमी दिली. नेहाने आपण गर्भवती असल्याचे फोटो टि्वट केले आहे. दोघांनी प्रेग्नेसीचे फोटोशूट केले. या फोटोसह नेहाने 3 of us असं लिहून हॅशटॅग सतनाम वाहेगुरु असं लिहिलंय. फेमिना मिस इंडिया 2018 च्या एका इव्हेंट नेहा आणि अंगद पोहोचले होते. तिच्या प्रकृतीवर अनेकांना प्रश्न निर्माण झाले होते. अखेर नेहानेच आता याबद्दल खुलासा केलाय.

Trending Now