Bigg Boss 12 : लिक झाली यादी, हे 6 सेलिब्रिटी होणार सहभागी

बिग बाॅस 12 च्या सिझनला 15 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या सिझनमध्ये सहभागी होणाऱ्या सदस्यांची यादी समोर आलीये. सृष्टी रोडे- 'इश्कबाज' मुळे चर्चेत आलेली सृष्टी रोडे बिग बॉसमध्ये सहभागी होणार आहे. तिचं नाव आधीच निश्चित झालं होतं. सुमीर पसरिचा- पम्मी आंटीच्या नावाने लोकप्रिय असलेले सुमीर पसरिचा हे बिग बाॅसच्या घरात असणार आहे.

स्कारलेट एम रोज- प्रत्येक वेळी बिग बाॅसच्या घरात रोडीज आणि स्पिल्ट्जविलात सहभागी झालेल्या कलाकाराला बोलवण्यात येतं. यावेळी स्कारलेट एम रोज संधी मिळालीये. स्कारलेट एम रोज ही स्पिल्ट्सविला 7 ची विजेती होती. सुबुही जोशी- 'स्पिल्ट्सविला सीजन-8' मुळे चर्चेत आलेली सुबुही जोशी यावेळी बिग बाॅसच्या घरात पाहण्यास मिळणार आहे. विभा छिब्बर - 'सपना बाबुल का बिदाई' या मालिकेत चर्चेत आलेली विभा छिब्बर बिग बॉसच्या घरात असणार आहे. चक दे इंडिया आणि ब्लॅकमेल सिनेमातही त्यांनी काम केलंय.

Trending Now