PHOTOS : ‘हे’ कलाकार आधी होते भाऊ-बहिण मग झाले 'कपल'

कुठलाही कलाकार असो, त्याने त्याच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. कधी ते एकमेकांचे भाऊ-बहिण बनतात कधी आई-वडिल तर कधी ते प्रियकराच्या भूमिकेत दिसतात. आज आम्ही तुम्हाला असे कलाकार सांगणार आहोत ज्यांनी चित्रपटात भावा-बहिणीची भूमिका निभावून त्यांनी प्रियकराची भूमिकी साकारली आहे. मिस वर्ल्ड प्रियांका चोप्रा आणि अभिनेता रणवीर सिंग या जोडीचे अनेकजण फॅन्स आहेत. या दोघांनी सुद्धा पडद्यावर दोन्ही भूमिका साकारल्या आहेत. ‘गुंडे’मध्ये ते कपल झाले होते तर ‘दिल धडकने दो’मध्ये ते भावा-बहिणीच्या भूमिकेत दिसले. दीपिका पदूकोण ‘रेस २’ मध्ये जॉन अबराहिमच्या बहिणीच्या भूमिकेत दिसली होती. मात्र ‘देसी बॉईज’ या चित्रपटात ती जॉनची प्रेमिका बनली होती.

त्यांनतर या दोघांनी ‘देवदास’, ‘मोहब्बतें’, ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमध्ये त्यांनी कपलची भूमिका साकारली आहे. जूही चावला आणि अक्षय कुमारने पण पडद्यावर दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. 'मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी'मध्ये हे दोघे रोमांस करताना दिसले तर 'एक रिश्ता' या चित्रपटात ते भाऊ-बहिण झाले होते. करीना कपूर आणि तुषार कपूर यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात एकाच वेळेस केली. त्याचवेळी त्यांचे दोन चित्रपट 'मुझे कुछ कहना है' आणि 'जीना सिर्फ मेरे लिए है' खूप प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटात त्यांनी कपलची भूमिका केली होती. २००८ मध्ये आलेल्या ‘गोलमाल रिर्टन्स’ या चित्रपटात या कपलने भावा-बहिणीची भूमिका साकारली होती.

Trending Now