मोदी, शहा आणि अडवानी... सांगा काय सांगतेय या नेत्यांची देहबोली?

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची केंद्रिय बैठक आज दिल्लीत झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप अध्यक्ष अमित शहा अग्रस्थानी होतेच, पण भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानीसुद्धा व्यासपीठावर अग्रभागी होते. अमित शहांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ २०१९च्या निवडणुकांसाठी वाढवण्यात आलाय. २०१९साठी भाजप सज्ज आहे का? काय सांगतेय या नेत्यांची देहबोली? (फोटो - पीटीआय)

भाजपच्या केंद्रिय कार्यकारिणीची बैठक झाली. भाजप २०१९साठी सज्ज आहे का?  या बड्या नेत्यांची देहबोली काय सांगतेय बघा? पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी व्यासपीठावर अग्रस्थानी होते. अमित शाह यांचा भाजप अध्यक्षपदाचा कार्यकाळ जानेवारी 2019 मध्ये संपतो. पण लोकसभा निवडणुका असल्यामुळे भाजप अध्यक्षांची निवडणूक एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अमित शहा यांचा कार्यकाळ हा वाढला आहे. आता पुन्हा अमित शहा किंग मेकर बनण्याच्या तयारीत आहेत का?

या बैठकीला मोदी, शहांबरोबर अडवानी आणि जेटली अग्रस्थानी होते. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. राज्या-राज्यातून या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी नेतेमंडळी दिल्लीत जमली होती. २०१९ सालच्या निवडणुकांच्या दृष्टीने 'अजेय भाजपा' ही घोषणा या वेळी स्वीकारण्यात आली. आम्हाला निवडणुका लक्षात घेऊन संघटना तयार करायची आहे. काही राजकीय पक्ष आमच्याविरोधात लोकांची दिशाभूल करत आहेत, परंतु आम्ही पुन्हा पुन्हा सत्तेवर येऊ' असं अमित शहा यांनी कार्यकारिणी बैठकीत म्हटलं आहे. पण भाजपचा हा 'आजचा' चेहरा आणि 'कालचा' चेहरा काय सांगतो?

Trending Now