बर्थडे स्पेशल : करमाळा ते बॉलिवूड...एका 'सैराट'काराचा प्रवास

मराठी सिनेसृष्टीतअल्पावधीत लोकप्रिय झालेले दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. मात्र त्याच्या एकाच चित्रपटीमुळे ते जगप्रसिद्ध झाले, तो चित्रपट म्हणजे सैराट. परश्या-आर्चीची जोडी घरोघरो पोहोचवणारे आणि अवघ्या जगाला याड लावणारे नागराज मंजुळे यांचा आज 42 वा वाढदिवस..चला तर मग जाणून घेऊयात त्याच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी. सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यातील जेऊर सारख्या छोट्याश्या गावात नागराज मंजुळे यांच्या गरीब घरात जन्म झाला. नागराज लहान असताना आर्थिक परिस्तिथी थोडी बिकटच होती. गावातल्या टुरिंग टॉकींजमधला चित्रपट पहायला त्यांना आवडायचे व्हिडिओवरही एक रूपया देऊन चित्रपट पहायला मिळायचे. शाळा बुडवून ते चित्रपट पहायला जात असत. त्यांना अमिताभ बच्चनचे चित्रपट आवडायचे. चित्रपटाचे वेड तिथूनच सुरू झाले. खरंतर नागराज यांना गोष्ट ऐकायला खूप आवडायचे. त्यांची मोठी आत्या, आई गोष्टी सांगायच्या, त्या ऐकताना नागराज त्या गोष्टीच्या जगात रमून जायचे.

अशा बिकट परिस्तिथित जेऊरमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले आणि त्यानंतर नागराज यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण जेऊर येथे झाले. पुढील शिक्षणासाठी ते पुणे विद्यापीठात शिकायला आले. मराठी विषयात एम.ए. करताना केशवसुत, मर्ढेकर, अरूण कोल्हटकर, नामदेव ढसाळ नव्याने भेटत गेले. अधिक जवळचे वाटत गेले. एम.फिल करत चित्रपटाचे विचार डोक्यात घट्ट बसलेले होते. सुरूवातीपासूनच नागराजला चित्रपटांची आवड होती. पुण्यात शिकत असताना त्याच्या मनात चित्रपट बनवण्याची कल्पना सुचली. २०१४ मध्ये त्याची चित्रपट ही इच्छा पूर्ण झाली. त्याआधी त्यांनी पिस्तुल्या हा लघू चित्रपट केला. समाजातल्या सामाजिक भेदभाव आणि परिणामी आर्थिक अडचणी पिस्तुल्या हा त्यांचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार विजेता लघुपट आहे. त्यानंतर 'फँड्री' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. नागराज यांच्या फँड्रीने अनेक फिल्म फेस्टिव्हलमध्ये आपली छाप पाडली. पण त्यानंतर त्यांना खरी ओळख मिळवून दिली ते सैराट या चित्रपटाने. २०१६ मध्ये प्रदर्शित झालल्या सैराटने मराठी चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. हा १०० कोटी कमावणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटातील आर्ची आणि परश्या या कलाकारांना तर लोकांनी डोक्यावर घेतलं. सैराट लोकांना इतका आवडला की, आजपर्यंत लोकांनी सैराट सिनेमा विसरला नाही. प्रेक्षकांच्यातील या चित्रपटाची क्रेझ पाहता दिग्दर्शन करण जोहरने हा चित्रपट हिंदीमध्ये बनवला आहे. नागराजने सैराट हा चित्रपट काढल्यानंतर लोकांचा मराठी चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून गेला. नागराज यांना आत्तापर्यंत इंदिरा गांधी पुरस्कार, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या सारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. नागराज मंजुळे यांच्या आगामी सिनेमात दस्तरखुद्द बाॅलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन काम करत आहे. अशा या हरहुन्नी दिग्दर्शकाला न्यूज18 लोकमतकडून खूप शुभेच्छा...!!

Trending Now