भारत बंद : गाढवगाडी, रेल रोको, धरपकड आणि घोषणाबाजी

काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या बंदला देशभरात कसा प्रतिसाद मिळाला त्याची ही दृश्य. काश्मीरपासून आंध्रापर्यंत आणि अहमदाबादपासून आरगताळ्यापर्यंत बंदचा हालहवाल...

काश्मीरमध्येही इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. श्रीनगरमध्ये काँग्रेसने काढलेल्या निषेध मोर्चात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. त्रिपुराची राजधानी अागरताळा इथेही भारत बंदला प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्तीला ताब्यात घेताना पोलीस. काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला CPM ने पाठिंबा दिला होता. कम्युनिस्ट नेते सिताराम येचुरी, डी राजा यांनी सरकारविरोधी घोषणा देत सीपीआयच्या रॅलीत भाग घेतला.

कोलकात्याच्या प्रसिद्ध हावडा ब्रिज परिसरातलं हे दृश्य. विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला वाहतुकदारांनी पाठिंबा दिला. त्यामुळे गाड्या अशा ठप्प झाल्या होत्या. श्रीनगरमध्ये काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष गुलाम अहमद मीर यांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आलं. सुरक्षा दलांच्या बंदोबस्त मोठा होता. या आंदोलनात महिला अग्रभागी होत्या. दिल्लीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या रॅलीत सहभाग घेतला. बहुतेक विरोधी पक्ष दिल्लीच्या रामलीला मैदानात एकत्र आले होते. मुंबईत काँग्रेसने रेल रोको आंदोलन केलं. अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली अंधेरी रेल्वे स्टेशनजवळ कार्यकर्ते रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटापासून आंदोलनाला सुरुवात केली. रामलीला मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, जनता दलाचे शरद यादव यांच्यासह विरोधी पक्ष दिल्लीच्या रामलीला मैदानात एकत्र आले होते. दिल्लीत विरोधकांची एकजूट : रामलीला मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, जनता दलाचे शरद यादव यांच्यासह विरोधी पक्ष दिल्लीच्या रामलीला मैदानात एकत्र आले होते. नवी दिल्लीत आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली. अलाहाबादमध्ये भाजपप्रणित सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत गाढवगाडीतून आंदोलन करण्यात आलं. पेट्रोलल दरवाढीला पेट्रोलियम मंत्री हा पर्याय देत असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं.

Trending Now