PHOTOS : अशी रंगली भैरवीची मंगळागौर

'स्टार प्रवाह'च्या 'ललित २०५' या मालिकेत मंगळागौरीचा सोहळा पाहायला मिळणार आहे. श्रावणातल्या मंगळवारी नवविवाहितेने मंगळागौरीचं व्रत करण्याची प्रथा आहे. भैरवीची पहिलीच मंगळागौर असल्यामुळे राजाध्यक्ष कुटुंबात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने घालून राजाध्यक्ष कुटुंबातील महिला मंडळ सज्ज आहे.

साग्रसंगीत पूजेसोबतच मंगळागौरीचे खेळ खेळत भैरवीची पहिली मंगळागौर साजरी करण्यात आली. लाडक्या नातसुनेचं कौतुक पाहून सुमित्रा आजी भारावून गेलीय मात्र नीलिमा आणि गार्गी काकू अद्यापही नाराज आहेत. त्यामुळे मंगळागौरीच्या कार्यक्रमात त्या सहभागी तर झाल्या आहेत पण या दोघींच्याही मनात मात्र अद्याप कटुताच आहे. नील आणि भैरवीचं काँट्रॅक्ट मॅरेज आहे. त्यामुळे ते उघड होईल की काय अशी भैरवीच्या मनातही भीतीचीच भावना आहे. राजाध्यक्ष कुटुंबाची आपण फसवणूक करत आहोत या विचारातच ती हरवून गेलीय.

Trending Now