PHOTOS : एसबीआयचे डेबिट कार्ड होणार बंद, नवीन कार्ड घेण्याची 'ही' शेवटची तारीख

नवी दिल्ली, 11 आॅगस्ट : भारतीय स्टेट बँकेचं एटीएम तुम्ही वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण एसबीआयने एटीएम कार्डसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. एसबीआयने आपले जुने मॅजिस्ट्रिप म्हणजे मॅग्नेटिक डेबिट कार्ड बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ग्राहकांना आता नवीन ईएमवी चिप लावलेले डेबिट कार्ड घ्यावे लागणार आहे. याची अखेरची तारिख ही 31 डिसेंबर 2018 असणार आहे. जर तुम्ही नवीन कार्ड घेतले नसेल तर तुम्हाला जुन्या कार्डद्वारे कोणताही व्यवहार करता येणार नाही. तुम्ही एटीएममध्ये गेला तर डेबिट कार्ड स्विकारले जाणार नाही. आता काय करायचं ? - बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, जुने एटीएम कार्ड बदलून घ्यावे लागणार आहे. त्या जागी तुम्हाला एव्हीएम चीप असलेले एटीएम कार्ड दिले जाईल.

नवीन कार्ड घेण्यासाठी तुम्हाला आॅनलाईन बँकिंगवरून कार्डसाठी नोंद करावे लागणार आहे. तसंच तुमच्या जवळील एसबीआयच्या शाखेत जाऊन सुद्धा नवीन कार्डसाठी नोंदणी करू शकता. बँकेनं फेब्रुवारी 2017 पासून जुने कार्ड वापरण्यास बंदी आणली आहे. 31 डिसेंबर 2018 नंतर कायम स्वरूपी हे कार्ड बंद करण्यात येतील. नवीन कार्डबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी एसबीआयने आपल्या वेबसाईटवर माहिती दिलीये https://bank.sbi/portal/web/personal-banking/magstripe-debit-cardholders म्हणून जुने कार्ड बंद - जुने एटीएम डेबिट कार्डमागे एक काळी पट्टी आहे. ही काळी पट्टी मॅग्नेटिक स्ट्रिप आहे. यात तुमच्या खात्याची संपूर्ण माहिती असते. एटीएममध्ये टाकल्यानंतर तुम्हाला पीन नंबर टाकावा लागतो त्यानंतर पैसे काढता येतात. खरेदी करण्यासाठीही हे कार्ड स्वाईप केले जाते.

Trending Now