शाहरुख-सलमान पॅचअप?

Sachin Salve
[wzslider]बॉलिवडूचा किंग खान अर्थात शाहरूख खान आणि 'दबंग' सलमान खान यांच्यातली 'दुश्मनी' जग जाहीर आहे. पण रविवारी या दुश्मनीचं रुपांतर दोस्तीत झाल्याचा तर्क लावला जात आहे. काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दिकी यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत या दोन्ही अभिनेत्यांनी हजेरी लावली. नुसती हजेरी लावली नाही तर एकमेकांची गळभेटही घेतली. 2008 पासून दोन्ही खानमध्ये तेढ निर्माण झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांचं तोंडही पाहण्यास दोघही टाळत होते. मात्र रविवारी झालेल्या इफ्तार पार्टीत या दोन्ही खाननी गळभेट घेतल्यामुळे दुश्मनी संपल्याची चर्चा बॉलिवडूमध्ये सुरू झालीय.

Trending Now