आज कुठल्या राशींना त्यांचे जुने मित्र भेटतील?

मेष - आज चंद्र आपल्या राशीत आहे. आज आपलं धैर्य आणि आत्मिक शक्ती यांची परीक्षाच होईल. तुमची महत्त्वाकांक्षा मोठी असली तरी ती पूर्ण करायची कुठलीच योजना तुमच्याकडे नाही. म्हणून तुम्हाला आज थोडं एकटं वाटेल. आज मन मारून तुम्ही तुमचं काम कराल. खूप मेहनत पडेल. जोडीदारासोबत भांडणं होतील. प्रकृतीच्या तक्रारी राहतील. डोकेदुखी होईल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. वृषभ - चंद्र आज बाराव्या स्थानात आहे. संध्याकाळी तो तुमच्या राशीत येईल. पूर्ण दिवस आरामात जाईल. तुम्हाला काही महत्त्वाचं काम करायचं असेल तर स्वत:लाच प्रोत्साहन द्यावं लागेल. दुसऱ्यांसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. जोडीदाराबरोबर चांगले संबंध राहतील. आज पैसाही जास्त खर्च होईल. थोडी थकावट जाणवेल. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. मिथुन - आज मंगळ अष्टमात आहे. आजचा दिवस सकारात्मक आहे. तुमच्या सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. पूर्ण दिवस प्रसन्न राहील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. जोडीदारासोबत गैरसमज होतील. तब्येत चांगली राहील. विद्यार्थ्यांना प्रवासाचे योग आहेत.

सिंह - आज तुम्ही सावधानता बाळगा. कुठलंही कठीण काम करू नका. मित्रांशी भांडणं होऊ शकतात.तुम्ही आज आध्यात्मिक कार्य केलंत तर ते चांगलं राहील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत गैरसमज वाढू देऊ नका. आज तुमच्याकडे पैसे कमी असतील. गुडघेदुखी वाढेल. विद्यार्थ्यांना चिंता सतावेल. कन्या - आज चंद्र अष्टमात आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. आज तुमच्या समोर कुठलं संकट येणार नाही. गेले काही दिवस सतावणारी एखादी समस्या मात्र जास्त जाणवेल. मन निराश होईल. जोडीदाराबरोबर जास्त वेळ घालवा. भावनांवर नियंत्रण ठेवा. थोडा ताप येईल. विद्यार्थ्यांना जास्त मेहनत करावी लागेल. तूळ - घर, कुटुंब, मित्र यात तुम्ही एकदम बिझी राहाल. आजचा दिवस चांगला आहे. नव्या नोकरीची संधी उपलब्ध होईल. जोडीदार थोडा रागवेल. त्याला तुमच्या तब्येतीची चिंता जाणवेल. कार्यक्षेत्रात प्रगतीची संधी निर्माण होईल. आज तुम्ही पैशावर नियंत्रण ठेवा. तब्येत चांगली राहील. वृश्चिक - आज चंद्र सहाव्या स्थानावर आहे. तुमच्या अडचणी कमी होतील. तुम्हाला जुने मित्र भेटतील. काही भांडणं झाली असतील ती मिटतील. जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतो. पण शेवट गोड होईल. प्रकृती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना दिवसभर अभ्यास करावा लागेल. धनू - आज तुम्हा अंतर्मुख होऊन विचार कराल. एखादा निर्णय घेणं कठीण जाईल. आज तुमचे प्रयत्न अयशस्वी होतील. कुटुंबातल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराबरोबर भांडण होईल. डोकेदुखी वाढेल. नोकरीत सावध राहा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला जाईल. मकर - चंद्र तुमच्या राशीच्या चौथ्या स्थानावर आहे. तुम्हाला योजनापूर्ण काम करावं लागेल. प्रवास घडेल. तुम्हाला कोणाला लग्नाचा प्रस्ताव द्यायचा असेल तर तुम्हाला गांभीर्य आणावं लागेल. चंचलता कमी करा. पैशाची चणचण जाणवेल. तणावाशी सामना करावा लागेल. तुम्ही भावनेवर नियंत्रण ठेवलंत, तर प्रकृती चांगली राहील. विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. कुंभ - आजचा दिवस शुभ आणि भाग्यशाली असेल. घरी पाहुणे येतील. नोकरीत कामाकडे लक्ष लागणार नाही.आज जास्त पैसे खर्च होतील. तुम्हाला संकटाला तोंड द्यावं लागेल. जोडीदाराबरोबर तणाव जाणवेल. पैसे कमी पडतील. मेहनत जास्त करावी लागेल. तुम्ही स्वत: समाधानी राहू शकणार नाही. मनात नकारात्मक विचार आणू नका. प्रसन्न राहायचा प्रयत्न करा. मीन - आज तुम्ही जास्त भावुक होऊ नका. तुमची पसंत नापसंत तर्काच्या आधारेच ठेवा. दिवसभर चढउतार जाणवतील. कुठल्याही वादात पडू नका. तुमची वाणी गोड ठेवा. मन शांत ठेवा नाहीतर रक्तदाब वाढू शकतो. विद्यार्थ्यांचं त्यांचे शिक्षक कौतुक करतील.

Trending Now