iPhoneचं वेगळेपण संपणार? अॅपलसुद्धा आणणार ड्युएल सिम फोन

अॅपलचा आयफोन आपल्याकडे असावा अशी अनेकांची इच्छा नसते. iPhoneचा दर्जा आणि त्याचं वेगळेपण ही त्यामागची कारणं. आता नवीन आयफोन लाँच होतोय, त्यात मात्र अँड्रॉइडप्रमाणे दोन सिमकार्डची सोय असणार आहे. त्यामुळे आयफोनचं वेगळेपण संपणार का याची चर्चा सुरू आहे.

अनेकांचं स्वप्न असतं की त्यांच्याकडे पण आयफोन असावा. अॅपल लवकरच नवीन फोन बाजारात आणणार आहे. तो फोन कसा असेल त्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अॅपल कंपनीचा आज रात्रीपासून मेगा इव्हेंट सुरू होणार आहे. त्या इव्हेंटची चर्चा सर्वत्र आहे. या इव्हेंटमध्ये iPhone, अॅपल वॉच आणि Macbook नवीन फिचरसह लाँच होणार आहेत. आयफोनमध्ये देखील मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. आत्तापर्यंत आयफोनमध्ये एकच सिम वापरू शकत होतो. पण आता नवीन आयफोनमध्ये दोन सिमची सुविधा दिली जाणार असल्याची माहिती मिळते आहे. अॅपलने मात्र अधिकृतपणे याला अद्याप दुजोरा दिलेला नाही.

Tech Carving या टेक्नॉलॉजी ब्लॉगने चीनच्या Weibo या न्यूज वेबसाइटवर नव्या आयफोनचे फोटो पाहिले. त्यामध्ये असं दिसतंय की नवीन आयफोन दोन सिमसह आहेत. टेक कार्विंगच्या रिपोर्टनुसार चायना टेलीकॉमने अाठवड्याच्या सुरुवातीलाच हा फोटो लाँच केला आहे. चायना टेलिमसोबत China Mobile आणि China Unicomने देखील हे पोस्टर प्रदर्शित केलंय. या पोस्टरमुळे हे तर नक्की झालंय की आता अण्ड्रॉइड प्रमाणेच आयफोन देखील डुएल सिममध्ये उपलब्ध होणार आहे. या पोस्टरमुळे हे तर नक्की झालंय की आता अण्ड्रॉइड प्रमाणेच आयफोन देखील ड्युएल सिममध्ये उपलब्ध होणार आहे. 

Trending Now