कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यातही एलिस्टर कुकने गाजवलं मैदान!

भारताविरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर एलिस्टर कुकने क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. भारताविरुद्ध सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यात त्याने शानदार शतक ठोकलंय. या शतकासह कुकच्या नावावर दोन नव्या विक्रमाची नोंद झालीय. कुकच्या कारकिर्दीतील हे ३३वं शतक होतं. शेवटच्या सामन्यात कुकने २८६ चेंडूत १४७ धावांची शानदार खेळी केली.

त्याचबरोबर कसोटीमध्ये पहिल्या आणि शेवटच्या सामन्यात शतक ठोकणारा कुक हा जगातला पाचवा खेळाडू ठरलाय. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाचे रेजिनाल्ड डफ, बिल पोन्सफोर्ड, ग्रेग चॅपेल आणि भारताचा मोहम्मद अझरुद्दीन या खेळाडूंनी असा विक्रम केला होता.

Trending Now