अक्षयचं हे फिटनेस रुटिन तुम्हाला जमणं अशक्यच!

हिंदी चित्रपटसृष्टीतील शाहरुख, सलमान आणि आमिर खानने तर त्यांच्या वयाची गोल्डन जुबली पार केली आहे. त्यात आता बॉलिवूडच्या खिलाडीची भर पडली आहे. अक्षय कुमार म्हणजेच राजीव भाटियाचा आज 51वा वाढदिवस आहे. अक्षयच्या फिटनेसचे तर बॉलिवूड अभिनेतेही मोठे फॅन आहेत. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला त्याचं फिटनेस रुटिन सांगणार आहोत. असं म्हटलं जातं की रात्रीचं जेवण हे सूर्यास्ताच्या आधी करावं. तुम्हाला जर कोणी 7च्या आत जेवायला सांगितलं तर तुम्ही थक्क व्हाल. पण अक्षय रोज 7च्या आत जेवतो. जे आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे तुम्हाला जमणं थोडं अवघड आहे.

अक्षय त्याचा डाएट चार्ट न चुकता फॉलो करतो. तो नाष्ट्यामध्ये पराठा आणि एक ग्लास दूध पितो, नंतर तो बाऊल भरून फळं खातो. दुपारी जेवणात हिरव्या भाज्या, चपाती, डाळ, चिकन आणि एक वाटी दही असतं. संध्याकाळी एक ग्लास ज्युस आणि रात्रीचं तो फक्त सुप, सॅलेड खातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रात्री लवकर झोपणं. त्याचं असं म्हणणं आहे की रात्री लवकर झोपल्यानं सकाळी लवकर उठायला मदत होते आणि ठरलेला दिनक्रम पाळता येतो. त्यामुळे अक्षय रात्री 9पर्यंत झोपतो.

Trending Now