PHOTOS : 2016पासून बाॅक्स आॅफिसवर अक्षय कुमार फक्त सुपरहिट

अक्षय कुमारच्या 'गोल्ड'ची घोडदौड सुरू आहे. लवकरच गोल्ड 100 कोटींचा पल्ला गाठणार आहे. 2016पासूनच अक्षय कुमारचे सिनेमे बाॅक्स आॅफिसवर हिट होतायत. टाकू या एक नजर अक्षय कुमारचा एअरलिफ्ट सुपरडुपर हिट ठरला होता. सत्य घटनेवरच्या या सिनेमानं बरेच पुरस्कार मिळवले. राष्ट्रीय पुरस्काराची मोहोरही सिनेमावर उमटलीय. हाऊसफुल सीरिजमधला हाऊसफुल 3 सिनेमा तर सुपरडुपर हिट होता. सिनेमानं 108 कोटींची कमाई केली होती. अक्कीची भूमिका हटके होती.

2016मध्ये आलेल्या रुस्तमनं तर 124.5 कोटींची कमाई केली होती. हा सिनेमाही सत्य घटनेवरचा सिनेमा होता. 2017ही अक्षयसाठी लकी होतं. जाॅली एलएलबीचा दुसरा भाग खूपच यशस्वी ठरला. सिनेमानं बाॅक्स आॅफिसवर 132.1 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आलेला टाॅयलेट एक प्रेमकथानं 132.1कोटींचा पल्ला गाठला होता. सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा सिनेमा लोकांना प्रचंड आवडला आणि त्याचं श्रेय अक्षयलाच. 2018 हे वर्षही अक्षयसाठी यशच घेऊन आलंय. पॅडमॅन हा तर आॅफबिट विषय. अजिबात टिपिकल हिंदी सिनेमात न मोडणारा. या सिनेमानं भले 100 कोटी पार नसतील केले, पण 78.2 कोटींची मजल मारली. आता रिलीज झालेला गोल्ड 92.2 कोटींपर्यंत पोचलाय. लवकरच तो 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

Trending Now