तुमच्यापेक्षा जास्त कमावतो Zomato आणि Swiggyचा डिलिव्हरी बॉय...

सध्याचा काळ हा ऑनलाइनचा काळ आहे. प्रत्येकजण कामात व्यग्र असल्यामुळे कपड्यांच्या शॉपिंगपासून ते खाण्याच्या ऑर्डरपर्यंत साऱ्याच गोष्टी ऑनलाइन मागवल्या जातत. पण तुम्हाला माहित आहे का की झोमॅटो, स्विगी आणि उबरइट्ससारख्या खाण्याचे पदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या डिलिव्हरी बॉयला तब्बल ४० ते ५० हजारांपर्यंत पगार दिला जातो. बिग बास्केट, अमेझॉन, फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयना सर्वसाधारणपणे २० हजारांपर्यंत पगार मिळतो. दोघांच्या कामाचं स्वरूप जरी सारखंच असलं तरी कपडे वा इतर साहित्य घरपोच करणाऱ्या आणि अन्नपदार्थ घरपोच करणाऱ्या डिलिव्हरी बॉयच्या पगारात एवढा फरक का असा प्रश्न पडतो.

मुंबई, पुणे, बंगळुरू आणि हैदराबादसारख्या कॉस्मोपॉलिटीयन शहरांमध्ये ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढते आहे. या शहरांमध्ये झोमॅटो, स्विग्गी आणि उबरइट्स कंपनीचे ऑनलाइन फूड डिलिव्हरी व्यापार जोमात सुरू आहे. त्यामुळे या कंपन्यांचे वाढते काम पाहता येथे कर्मचाऱ्यांचा तुडवडा जाणवत आहे. येथील कर्मचाऱ्यांना प्रत्येक डिलीव्हरी मागे ८० ते १२० रुपये दिले जातात. तसेच जास्त वेळ काम केल्यास इंसेन्टिव्हही दिले जातात. मात्र अमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या डिलिव्हरी बॉयना प्रत्येक डिलिव्हरी मागे ४० ते ४५ रुपये दिले जातात. तसेच अधिक काम केल्यास त्यांनाही इंसेन्टिव्ह दिले जातात. याच कारणामुळे अनेक अमेझॉन आणि फ्लिपकार्टचे डिलिव्हरी बॉय मोठ्या प्रमाणात नोकरी बदलून झोमॅटो, स्विग्गी आणि उबरइट्स कंपनीमध्ये जात आहेत.  

Trending Now