नाव शिवाजी महाराजांचं आणि काम अफझल खानाचं - योगींचा शिवसेनेवर हल्लाबोल

शिवसेना शिवाजी महाराजांचं नाव घेते मात्र काम अफझल खानाचं करते अशी जळजळीत टीका योगींनी शिवसेनेवर केली.

Ajay Kautikwar
मुंबई,ता.23 मे: पालघर पोटनिवडणूकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची बुधवारी रात्री विरारमध्ये प्रचारसभा झाली. या सभेत योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना शिवाजी महाराजांचं नाव घेते मात्र काम अफझल खानाचं करते अशी जळजळीत टीका योगींनी शिवसेनेवर केली.चिंतामण वनगांच्या मुलाला आपल्या पक्षात घेऊन शिवसेनेनं भाजपच्या पाठित खंजिर खुपसला आहे अशी टीकाही त्यांनी केली. योगींनी बाळासाहेब ठाकरे यांचा गौरवानं उल्लेख केला. बाळासाहेबांना विसरणं शक्य नाही असंही ते म्हणाले.शिवसेनेनं आज भाजपबाबत जी भूमिका घेतली ती पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला दु:ख झालं असेल असंही ते म्हणाले. योगी आदित्यनाथांनी आपल्या भाषणाची सुरवात मराठीत करत प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या.

Trending Now