फेसबुक, व्हॉटस्अॅप स्काईप सारख्या अॅप्सवर निर्बंध येणार?

तुमच्या रोजच्या वापरात असलेल्या व्हॉटस्अॅप, फेसबुक, स्काईप या सारख्या अॅप्सवर आता केंद्र सरकार लवरकरच निर्बंध घालण्याची शक्यता आहे.

Samruddha Bhambure
06 एप्रिल : तुमच्या रोजच्या वापरात असलेल्या व्हॉटस्अॅप, फेसबुक, स्काईप या सारख्या अॅप्सवर आता केंद्र सरकार लवरकरच निर्बंध घालण्याची शक्यता आहे.  लवकरच आता यावर केंद्र सरकारचे नियमलागू होणार आहेत. तसं आश्वासनच सरकारनं सुप्रीम कोर्टाला दिलं आहे.देशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या ट्राय या संस्थेप्रमाणेच सोशल मीडियाची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही एक यंत्रणा असावी, असा काल केंद्र सरकारचा आहे.  यामध्ये व्हॉट्स ऍप, फेसबुक, स्काईप, वी चॅट आणि गुगल टॉकसारख्या अॅप्सचा समावेश आहे. त्यानं या कॉल्सवर कसा परिणाम होईल, ते अजून कळू शकलेलं नाही. पण कॉल्स करण्याची प्रक्रिया थोडी बदलू शकते.या सगळ्या सेवा वापरताना ग्राहकांची प्रायव्हसी राहत नाही, असा दावा करणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान आम्ही लवकरच या सेवांचं नियमन करू, असं सरकारनं कोर्टाला सांगितलं. याचा अर्थ एवढाच की व्होडाफोन किंवा बीएसएनएलला जे नियम आणि कायदे लागू आहेत, तेच आता व्हॉटस्अॅप कॉल्स, स्काईप आणि फेसबुक व्हिडिओलाही लागू होतील.

Trending Now