पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही, भाजपला हटवणं हेच टार्गेट - ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

नवी दिल्ली, ता.1,ऑगस्ट : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. पंप्रधानपदाच्या शर्यतीत मी नाही, भाजपला सत्तेवरून खाली खेचणं हाच सर्व विरोधीपक्षांचा मुख्य उद्देश आहे असं ममता यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 2019 च्या निवडणूकीत भाजप विरोधात विरोधकांची मोट बांधण्याचा ममता बॅनर्जींचा जोरदार प्रयत्न करत आहेत. त्याच उद्देशाने त्यांनी बुधवारी दिल्लीत अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मोर्चेबांधणी केली.VIDEO : काँग्रेसच्या चिन्हासमोरचं बटन दाबलं भाजपला मतदान,निवडणूक अधिकारी म्हणतात...जळगाव, सांगलीत 55 टक्के मतदान, दोन 'दादां'चं वर्चस्व पणाला

ममता बॅनर्जी यांनी सोनियांच्या निवासस्थानी जावून त्यांची आणि राहुल गांधींची भेट घेऊन चर्चा केली. 2019 च्या निवडणूका, आसाममधला बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न आणि इतर राजकीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. निवडणूकीनंतर सर्व पक्ष एकत्र येवून नेता ठरवतील असंही त्या म्हणाल्या. सोनियांशी जुनी मैत्री आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.मराठा क्रांती मोर्चाची उद्या महत्त्वाची बैठककोकण रेल्वे पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारएनआरसीच्या मुद्यावर बोलताना देशात गृहयुद्ध होईल असं वक्तव्य मी दिलं नाही. फक्त त्या 40 लाख लोकांबद्दल चिंता व्यक्त केली. जे आपलं नागरिकत्व सिद्ध करू शकले नाही त्यांचं काय करायचं याचा विचार झालेला नाही. भाजप या प्रश्नाचं राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दलित संघटनांचा विजय,'अॅट्रॉसिटी'बद्दल केंद्राचा मोठा निर्णय

पुण्याचा वादग्रस्त नगरसेवक दीपक मानकर अखेर पुणे पोलिसांना शरण

बुधवारी सकाळी ममता बॅनर्जी या संसदेतल्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यालयात आल्या होत्या. नंतर त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांची त्यांच्या संसदेतल्या कार्यालयात जावून भेट घेतली. ही भेट 20 मीनिटं चालली. ही सदिच्छा भेट असल्याचं ममतांनी स्पष्ट केलं. तर भाजपचे निलंबित खासदार किर्ती आझाद यांनी ममतांच्या तृणमूलच्या कार्यालयात भेट घेतली. काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद आणि अहमद पटेलही ममतांना संसदेत भेटले.  

Trending Now