गावाकडचे गणपती : नीरा नदी तीरावरील अकलूजचा आनंदी गणेश

अकलूजमध्ये नीरा नदीच्या काठावर आनंदी गणेशाचं मंदिर आहे. नावाप्रमाणेच या गणेशदर्शनाने भाविकांना आनंदप्राप्तीचा अनुभव येतो.

मधुकर गलांडे, सोलापूर, 12 सप्टेंबर : सोलापूर जिल्हा तसा नशिबवानच म्हणावा लागेल. पांडुरंगाचं पंढरपूर, अंबाबाईचं तुळजापूर, स्वामी समर्थांचं अकक्लकोट, सोलापुरातलं सिद्धेश्वर अशा अनेक देवदेवतांचं वास्तव्य इथल्या देवभूमित आहे. त्याचबरोबर याच जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातल्या अकलूजमध्ये नीरा नदीच्या काठावर आनंदी गणेशाचं मंदिर आहे. नावाप्रमाणेच या गणेशदर्शनाने भाविकांना आनंदप्राप्तीचा अनुभव येतो.नीरा नदीच्या तीरावरील या शांत, स्वच्छ आणि सुंदर परिसरातील आनंदी गणेश मंदिरात दररोज सकाळ-संध्याकाळ आरतीचे सूर आणि तल्लीन करण्याची क्षमता असलेला घंटेचा आवाज गुंजतो.अकलूज पासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असेलेलं हे अकलुजकरांचं ग्रामदैवत. शहरापासून निघालं की झाडांनी कमान केलेल्या रस्त्यावरील हिरवाई पाहताच तुमचा थकवा दूर होतो. थोड्याश्या वळणा-वळणाच्या रस्त्याने पुढे गेलं की टेकडीच्या वरच्या थोड्या सपाट भागात झाडांमध्ये दडलेलं देऊळ म्हणजेच आनंदी गणेश मंदिर.

याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. सकाळी किंवा संध्याकाळी निसर्गातली किंवा आनंदी गणपतीच्या दर्शनाने मिळणारी ऊर्जा मिळवण्यासाठी अकलुजकर इथे गर्दी करतात. आंबा आणि चिकुच्या बागांमुळे इथे येणाऱ्या पक्षांची संख्याही मोठी आहे. तर भाविकांसाठी ध्यानमंदिर असल्यानं तासनतास भाविक इथे ध्यानस्त बसलेले असतात. या सगळ्या वातावरणामुळे मिळणारं समाधान शब्दात न सांगता येणारं असतं. दररोज सकाळी महाप्रसाद वितरित होतो. भाविकांसाठी सांस्कुतीक कार्यक्रमाचंही इथे आयोजन केलं जातं, असे येथील पुजारी मुगदुल शाश्त्री सांगतात.या आनंदी गणेश मंदिराची मोहिते पाटील कुटुंबियांकडून दोन हजार मध्ये स्थापना करण्यात आली. मंदिर समितीच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमही राबवले जातात. यात आरोग्य शिबिरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश असतो. याशिवाय रसिकांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचीही मेजवानी सुद्धा असते अशी माहिती येथील विश्वस्त रोहीत घोरपडे आणि व्यवस्थापक बापुराव भिंगारदिवे यांनी दिली.निसर्गाच्या कुशीत असलेल्या या आनंदी गणेशाच्या दर्शनासाठी इथे दूरवरून भाविक येत असतात. हिरव्यागार परिसराच्या दर्शनानं मन अगदी प्रसन्न होतं आणि आपोआपच नतमस्तक व्हावंस वाटतं. VIDEO : बाप्पासाठी उकडीचे मोदक करा ५ सोप्या स्टेप्समध्ये

Trending Now