भारतीय तुरूंगांबाबत बोलू नका, याच तुरूंगात गांधी, नेहरूंना ठेवलं होतं - स्वराज यांनी ब्रिटनला फटकारलं

कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या प्रकरणावर भारतीय तुरूंगाबाबत वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारलं आहे.

Ajay Kautikwar
नवी दिल्ली,ता. 28 मे: कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या प्रकरणावर भारतीय तुरूंगाबाबत वक्तव्य करणाऱ्या ब्रिटनला परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी फटकारलं आहे. भारतीय तुरूंगांबाबत उपदेश करण्याचा अधिकार ब्रिटनला नाही, याच तुरूंगांमध्ये ब्रिटिशांनी महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना ठेवलं होतं असं पंतप्रधान मोदींनी ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांना परखडपणे सांगित आहे अशी माहितीही त्यांनी दिली.भारतातल्या तुरूंगातली स्थिती चांगली नाही असं वक्तव्य ब्रिटनमधल्या कोर्टानं केलं होतं. त्यावर स्वराज यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.गेल्या चार वर्षात भारताला आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मोठं यश मिळालं आहे. भारत कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्रपणे आपलं धोरण राबवत आहे. जगातल्या 192 देशांपैकी 186 देशांना भारतातल्या मंत्र्यांनी भेट दिली आहे असंही त्यांनी सांगितंलं.

 

Trending Now