VIDEO : नोकरीवरुन काढलं म्हणून आत्महत्येसाठी टॉवरवर चढला पण...

टाॅवरवर चढल्यानंतर त्यानेच पोलीस कंट्रोलरुमला फोन करून आपण टाॅवरवर चढलो असून आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं.

Sachin Salve
मुंबई, 06 जुलै : वरळी परिसरात एक तरुण दुरदर्शनच्या टाॅवरवर चढून शोले स्टाईल राडा घातला. लोकांनी या तरुणाला खाली उतरवण्यासाठी प्रयत्न केला पण तो काही खाली आला नाही. अखेर अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन चार तासांच्या प्रयत्नानंतर या तरुणाला खाली उतरवले.अजय पासवान असं या तरुणाचं नाव आहे. अजयने टाॅवरवर चढून आत्महत्याचा इरादा केला होता. अजय हा एका खासगी कंपनीत नोकरीला होता. पण अचानक नोकरी गेल्यामुळे त्याने टाॅवरवरुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि टाॅवरवर चढला. टाॅवरवर चढल्यानंतर त्यानेच पोलीस कंट्रोलरुमला फोन करून आपण टाॅवरवर चढलो असून आत्महत्या करणार असल्याचं सांगितलं.अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी टाॅवरवर चढून अजयची मनधरणी केली आणि चार तासानंतर त्याला सुखरूप खाली उतरवलं. सध्या अजयला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Trending Now