जेरूसलेममध्ये अमेरिकेच्या दुतावासाचं उद्घाटन, पॅलेस्टाईनमध्ये हिंसाचारात 37 ठार

इस्रायल मधल्या ऐतिहासिक जेरूसलेममध्ये सोमवारी अमेरिकेचं दुतावास अधिकृतपणे सुरू झालं. पॅलेस्टाईनने या निर्णयाला विरोध केला असून गाझा पट्टीतल्या सघर्षात 37 जण ठार झाले आहेत.

Ajay Kautikwar
जेरूसलेम,ता.14 मे : इस्रायल मधल्या ऐतिहासिक जेरूसलेममध्ये सोमवारी अमेरिकेचं दुतावास अधिकृतपणे सुरू झालं. व्हाईट हाऊसच्या सल्लागार इव्हेंका ट्रम्प, जेरार्ड कुशनेर आणि अमेरिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही महिन्यांपूर्वीच याची घोषणा केली होती. त्यानंतर जेरूसलेममध्ये नवीन दुतावास बांधण्यात आला. आता राजधानी तेल अविव वरून दुतावास या नव्या इमारतीत हलवण्यात येणार आहे.दरम्यान अमेरिकेच्या या कृतीचा पॅलेस्टाईनमध्ये जोरदार विरोध होतोय.

उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच गाझा पट्टीत इस्रायल सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत 37 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले. अमेरिकेचा हा निर्णय चिथावणीखोर असल्याचा आरोप पॅलेस्टाईनने केले आहे. तर जगभरातून अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध झाला होता. 

Trending Now