रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

नवी दिल्ली, ता.10 ऑगस्ट : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांच्या विरूद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. आसाम मधल्या नगांव जिल्ह्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे घटना आठ महिन्यांपूर्वीची आहे. राजेन गोहेन आणि त्या महिलेची ओळख असून त्यांचं त्या महिलेकडे जाणं येणं होतं.नगांव च्या पोलीस उपाधीक्षक संबिता दास यांनी महिती देताना सांगितलं की तक्रार आल्यानंतर पोलीसांनी 2 ऑगस्टला गुन्हा नोंदवून घेतला आहे. त्याचा तक्रार क्रमांक 2592-18 असा आहे. भारतीय दंड संहितेनुसार कलम 417(फसवणूक), 376 (बलात्कार) आणि 506 ( धमकी देणं) ही कलमं लावण्यात आली आहेत. पीडीत महिलेची जबाब घेण्यात आला असून तीने वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. ही घटना घडली तेव्हा महिलेच्या घरी तीचे कुटूंबिय आणि पती नव्हता अशी माहिती पोलीसांनी दिलीय.हेही वाचा...

काळ आला होता, वेळ नाही : भुस्खलनातून असा वाचला स्कुटरस्वारब्रिटिश एअरवेज वर्णव्देषी,त्यांच्यावर बहिष्कार टाका : ऋषी कपूरचा संताप खळबळजनक खुलासा : 'मुंबई, पुणे, सातारा हिंदु्त्ववाद्यांच्या रडावर', 20 बॉम्ब जप्तInd vs End- खेळण्याची संधी देऊन विराटनेच दिला दगा

Trending Now