'जेएनयू'चा विद्यार्थी नेता उमर खालीदवर गोळीबार, हल्लेखोर फरार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) वादग्रस्त विद्यार्थी नेता उमर खालीद आज सकाळी गोळीबारातून थोडक्यात बचावला.

नवी दिल्ली, ता.13 ऑगस्ट : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) वादग्रस्त विद्यार्थी नेता उमर खालीद आज सकाळी गोळीबारातून थोडक्यात बचावला. उमरवर अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला, उमर खाली पडल्याने तो थोडक्यात बचावला. त्याच्या सोबतच्या माणसांनी हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याचं पिस्तुल खाली पडलं मात्र हल्लेखोर फरार झाल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. ही घटना संसद भवन असलेल्या अतिसुरक्षीत समजल्या जाणाऱ्या परिसरात घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.VIDEO :हफ्ता दिला नाही म्हणून भाजप नगरसेवकाचा हाॅटेलमध्ये धुडगूस... म्हणून सोशल मीडियावर होतायेत रवी शास्त्री ट्रोल

दिल्लीतल्या प्रसिद्ध कॉन्स्टिस्ट्युशन क्लब मध्ये आयोजित 'खौफ से आझादी' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उमर खलीद आला होता. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी तो काही सहकार्यांसोबत क्लबच्या बाहेर एका टपरीवर चहा पीत असतानाच त्याच्यावर हल्ला झाला. हल्लेखोराने पांढरा रंगाचा शर्ट घातलेला होता. हल्लेखोर उमरच्या जवळ आला आणि त्याने गोळी झाडली. या गडबडीत उमरचा तोल गेला आणि तो खाली कोसळला त्यामुळे तो बचावला अशी माहिती दिल्लीचे पोलीस सहआयुक्त अजय चौधरी यांनी दिली.वाढदिवसाला प्रेयसी दुसऱ्याशी बोलली, प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्नया कार्यक्रमात प्रशांत भुषण, प्रा, अपूर्वानंद, रोहित वेमुल्लाची आई यांच्यासह अनेक जणांचा सहभाग होता. जेएनयुमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात वादग्रस्त घोषणाबाजी झाल्याने कैन्हय्या कुमारसोबत उमर खालीदही चर्चेत आला होता. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. अनेक सामाजिक संघटनांनी उमरवरच्या हल्ल्याचा निषेध केलाय. 

Trending Now