उल्हासनगर,अंबरनाथचा परिसरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला

उल्हासनगर आणि अंबरनाथच्या काही भागात हादरे जाणवल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे

उल्हासनगर,13 जुलै : उल्हासनगर आणि अंबरनाथच्या काही भागात भूकंपाचे हादरे जाणवल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे.उल्हासनगरच्या खेमानी, म्हारळ, सेंच्युरी रेयॉनच तर अंबरनाथच्या न्यु भेंडीपाडा,बुवापाडा परिसरात घरात असलेल्या नागरिकांना हे धक्के जाणवल्याचे नागरिक सांगत आहेत. हादरे बसल्यानंतर घाबरून अनेक नागरिक घराबाहेर आले होते.दरम्यान, सोशल मीडियावर लगेचच या संबंधीची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. कल्याण-डोंबिवली परिसरात जाणवलेले धक्के हे भुकंपाचे धक्के होते. रायगड जिल्ह्यात जमीनीखाली ५ किमी खोलीवर या भुकंपाचे केंद्र होते. त्याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे.गूढ धक्क्यांनी हादरला कल्याण डोंबिवलीचा परिसर !

Trending Now