ब्रेग्झिटच्या मुद्यावरून ब्रिटनमधलं सरकार धोक्यात

ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन व ब्रेग्झिट मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत आल्या आहेत.

लंडन,ता.10 जुलै : ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन व ब्रेग्झिट मंत्री डेव्हिड डेव्हिस यांनी एकापाठोपाठ एक राजीनामे दिल्याने पंतप्रधान थेरेसा मे अडचणीत आल्या आहेत. ब्रिटनच्या युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेतील (ब्रेग्झिट) धोरणात्मक बाबींवर मतभेद झाल्याने दोन मंत्र्यांनी लागोपाठ राजीनामे दिले आहेत. जॉन्सन हे ब्रेग्झिट समर्थक मंत्र्यांमधील प्रमुख असून ते सोमवारी सकाळी डाऊनिंग स्ट्रीटजवळच्या परराष्ट्र कार्यालयात आलेच नाहीत, त्यामुळे शंका निर्माण झाल्या. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा राजीनामा थेरेसा मे यांनी स्वीकारला असून त्यांच्या जागी लगेचच दुसरी नियुक्ती केली जाणार आहे.

थायलंडच्या मुलांच्या सुटकेचं हे आहे महाराष्ट्र कनेक्शन

मोहिम फत्ते! थायलंडच्या गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका

थेरेसा मे यांनी जॉन्सन यांचे त्यांनी केलेल्या सेवेबाबत आभार मानले आहेत. जॉन्सन हे जून २०१६ पासून परराष्ट्रमंत्री होते. नवीन ब्रेग्झिट योजनेबाबत पंतप्रधान मे या संसदेत निवेदन करण्याआधीच त्यांनी राजीनामा दिला. २९ मार्च २०१९ अखेरीस ब्रिटनने युरोपीय समुदायातून बाहेर पडणे अपेक्षित आहे. ब्रेग्झिटच्या मुद्यावर थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात दोन गट पडले आहेत. एका गटाला पूर्णपणे बाहेर पडायचं आहे. तर दुसरा गट हा थेरेसा मे यांच्या जवळचा असून बाहेर पडल्यानंतरही त्यांना युरोपीयन युनियनशी काही प्रमाणात जवळीक पाहिजे आहे.

समलैगिंकता गुन्हा आहे की नाही? सुप्रीम कोर्ट लवकरच देणार निर्णय

मृत्यूपूर्वी सुनील दत्त यांनी लिहिलं होतं परेश रावल यांना पत्र

डेव्हिस यांना २०१६ मध्ये ब्रेग्झिट मंत्री म्हणून नेमण्यात आले होते. युरोपीय समुदायातून ब्रिटनच्या माघारीच्या वाटाघाटींच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. डेव्हिस यांनी मे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे, की सरकारचा माघारीचा प्रस्ताव हा देशाला अतिशय कमकुवत अशा वाटाघाटींच्या स्थितीत ढकलेल असे मला वाटते. या प्रस्तावातील धोरणे व डावपेच हे सीमा शुल्क व एकल बाजारपेठेच्या कचाटय़ातून ब्रिटनला सोडवण्याची शक्यता नाही.  

Trending Now