उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्या, दिवाकर रावतेंचं आवाहन

"आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असू तर त्यांच्याविरोधात एकही उमेदवार उभा राहता कामा नये"

सातारा, 30 आॅगस्ट : छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून साताऱ्याच्या खासदारांना बिनविरोध निवडून द्यावं, असं वक्तव्य शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी साताऱ्यात केलंय. शिवसेनेच्या या अजब भुमिकेबद्दल सर्व शिवसैनिकांनी देखील आश्चर्य व्यक्त केलंय लोकसभेची स्वबळाची घोषणा करणाऱ्या शिवसेनेने सातारा लोकसभेसाठी तलवार म्यान केली असून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून साताऱ्याच्या खासदारांना सर्वांनी मिळून बिनविरोध निवडून दिले पाहिजे असं शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात दिवाकर रावते यांनी म्हटलंय. शिवसेनेच्या या अजब भुमिकेबद्दल सर्व शिवसैनिकांनी आश्चर्याचा धक्का बसलाय. सातारा लोकसभा उमेदवारीबाबत जिल्हा शिवसेनेच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात सातारा जिल्हाप्रमुख हर्षद कदम, चंद्रकांत जाधव, महिला प्रमुख शारदा जाधव, अनिता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रावते यानी उदयनराजेंचे कौतुक करीत बिनविरोध निवडून आणण्याचे आवाहन केलं.

रावते म्हणतात...आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांना मानत असू तर त्यांच्याविरोधात एकही उमेदवार उभा राहता कामा नये. छत्रपतींचा वारस म्हणून महाराष्ट्रातला हा खासदार दिल्लीत बिनविरोध निवडून गेला पाहिजे. ही भूमिका मी मांडली पण हे सर्वांनी ऐकलं पाहिजे अशी भूमिका उदयनराजेंनी मांडली. या सभेत आम्ही छत्रपतींना नमन करायचं आणि त्यांच्या वारशाला विरोध करायचा..आता तर त्यांना बेवारस करण्याचा कट रचला जातोय. त्यांच्याविरोधात शिवेंद्रराजे उभे राहणार आहे. ते कसे बेवारस राहतील ?, दैवतापुढे नतमस्त होण्याचीही पद्धत असते असं रावते म्हणाले.तसंच उदयनराजे कचऱ्याचा डंपर घेऊन फिरताना मी टीव्हीवर पाहिलं. त्यांचं बंधू असे फिरतील का ? ते आलिशान कारमध्येच फिरतील अशी टीकाही रावतेंनी केली. तसंच हे माझं व्यक्तिगत मत आहे असंही रावतेंनी स्पष्ट केलं.VIDEO : कार नव्हे, उदयनराजेंनी डंपर घेऊन शहरात मारला फेरफटका

Trending Now