'पीएमपी'वरून तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी भाजपचेच पदाधिकारी आक्रमक !

कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांना पीएमपीएमलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवण्यासाठी आता सत्ताधारी भाजपचेच पदाधिकारी आक्रमक बनलेत. तुकाराम मुंढेंना हटवा, यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनच थांबले नाहीतर तर पीएमपीएमएलला दिली जाणारी 268 कोटींची रक्कम न देण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केलाय.

Chandrakant Funde
18 जानेवारी, पिंपरी चिंचवड : कर्तव्यकठोर प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांना पीएमपीएमलच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून हटवण्यासाठी आता सत्ताधारी भाजपचेच पदाधिकारी आक्रमक बनलेत. तुकाराम मुंढेंना हटवा, यासाठी भाजपचे स्थानिक पदाधिकारी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहूनच थांबले नाहीतर तर पीएमपीएमएलला दिली जाणारी 268 कोटींची रक्कम न देण्याचा ठराव पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीनं मंजूर केलाय. स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनीच स्वतः यासंबंधीची माहिती दिलीय.तुकारम मुंढे हे एकारधिकारशाही पद्धतीने पीएमपीएमएलचा कारभार हाकत असल्याने त्यांना तात्काळ या हटवावं अशी मागणीच पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपनं केलीय. तुकाराम मुंढेंनी पीएमपीएमलचा कारभार हाती घेतल्यापासून सत्ताधाऱ्यांना न रुचणारे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच ते आता सत्ताधाऱ्यांना नकोसे झालेत. क्रीम पोस्ट न मिळाल्यामुळेच तुकारम मुंढे या कारवाया करत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या अध्यक्षांनी केलाय.पाहुयात तुकाराम मुंढेंनी कोण निर्णय घेतलेत ?

तसंच राजकीय पक्षांशी संबंधित कर्मचारी संघटनांची कार्यालयं रिकामी करण्याचे आदेशही मुंढेंनी दिलेत.पीएमपीएमलच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस नाकारण्यात आला. भरती प्रक्रियेतल्या त्रुटींमुळे १५८ कर्मचाऱ्यांना रुजू करून घेतलं नाही. तसंच वारंवार दांडी मारणाऱ्या 158 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय.सोलापुर महापालिकेतली कारकीर्द वादळी ठरल्यानंतर तुकाराम मुंढेंकडे नवी मुंबई महापालिकेची सूत्र सोपवण्यात आली. तिथं देखील तुकाराम मुंढेंना सर्वपक्षीय नगरसेवकांनी विरोध केला. त्याचीच पुनरावृत्ती पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून केली जातेय. त्यामुळं सोयीचं राजकारण करण्यासाठी धडाकेबाज अधिकाऱ्यांना होणारा विरोध मुख्यमंत्री खपवून घेणार का असा सवाल सर्वसामान्य जनतेला पडला तर वावगं वाटायला नको..

Trending Now