...ही शेवटची संधी नाहीतर तुमचे कुटुंब संपवू, तुकाराम मुंढेंना पुन्हा धमकी

तुमचे डोळे फोडू, हातपाय तोडून तुम्हाला आॅफिसबाहेर फेकून देऊ अशी धमकी या पत्रात देण्यात आलीये

Sachin Salve
27 सप्टेंबर : पीएमपीचे सीएमडी आणि धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंडे यांना पुन्हा धमकीच पत्र आलंय. यावेळी कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी या पत्रात देण्यात आलीये.आधीच्या पत्राबाबत मुंडे यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार ही दिली होती. त्यानंतर मुंडे यांना रुणे पोलिसांनी संरक्षण ही दिलं होतं. मात्र पुन्हा हे पत्र आलं आहे. यावेळीसुद्धा भुंजगराव मोहिते या व्यक्तीने हे पत्र लिहिलंय. तुमचे डोळे फोडू, हातपाय तोडून तुम्हाला आॅफिसबाहेर फेकून देऊ अशी धमकी या पत्रात देण्यात आलीये.धक्कादायक म्हणजे पुण्यात 1975-76 च्या दरम्यान अभिनव महाविद्यालयातील राजेंद्र जक्कळ, दिलीपकुमार,सुहास चांडक,शहा यांनी जोशी, अभ्यंकर, हेगडे आणि बाफना या कुटुंबियांची हत्या केली होती या हत्याकांडाचा दाखला देत तुमच्यासह 4 ते पाचजणांचे कुटुंब नाहीसे करू अशी धमकीही दिली आहे. जेष्ठांच्या पासाची रक्कम कमी करावी अशी मागणी ही या धमकीच्या पत्रात देण्यात आली आहे.

 =====================

Trending Now