मुंबईतले तीन टोलनाके हलक्या वाहनांसाठी 'टोल फ्री'

आनंदनगर मुलूंड, एलबीएस आणि ऐरोली नाका टोल फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबई,ता.20 ऑगस्ट : मुंब्रा बायपासचं काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतले तीन टोल नाके हलक्या वाहनांसाठी टोल मुक्त करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट या काळात हलक्या वाहनांना टोल द्यावा लागणार नाही. तर व्यावसायीक जड वाहनांना मात्र टोल द्यावा लागेल.मुब्रा बायपासचं काम सुरू असल्याने त्याचा ताण ठाणे, मुलूंड आणि ऐरोलीतल्तयाल्या हायवेंवर पडतो. वाहनांची गर्दी होत असल्याने टोल नाक्यांवर वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडी होते. आनंदनगर मुलूंड, एलबीएस आणि ऐरोली नाका टोल फ्री करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचा परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांवर होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.पावसामुळे आधीच रस्त्यांची चाळण झालीय. त्यामुळे सरकारला प्रचंड टीकेचा सामना करावा लागतोय. किमान रस्ते चांगले करू शकत नसाल तर कर तरी कशाला द्यायचा आशी लोकांची तक्रार आहे. त्यामुळे सरकारवरचा दबाव वाढतोय. अशातच विविध कामांमुळे वाहन चालक रस्ताकोंडीने हैराण झाले आहेत. तासं तासं थांबावं लागत असल्याने वाहन चालक त्रासून गेले आहेत. त्यावर तीव्र असलेल्या जनभावना शांत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जातंय.व्यावसायीक आणि जड वाहनांना मात्र या निर्णयातून सुट देण्यात आलेली नाही. त्यांना नेहमीप्रमाणेच टोल द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळं टोलनाक्यावरच्या रांगा कमी होऊन वाहतूक कोंडी टळेल अशी आशा आहे. सकाळी ऑफिसच्या वेळी आणि सायंकाळी ऑफिस सुटल्यानंतर वाहतूक कोंडीत भर पडते त्यामुळे या निर्णयामुळं वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

   

Trending Now