दौंड गोळीबारातील आरोपी SRPF जवान संजय शिंदेला सुपे इथून अटक

SRPF च्या जवानानं केलेल्या गोळीबारानं आज दौंड शहर हादरलं...संजय शिंदे असं या जवानाचं नाव असून त्यानं दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला.

Chandrakant Funde
16 जानेवारी, दौंड( जि. पुणे) : मटक्याच्या वादातून गोळीबार करून तिघांचा बळी घेणाऱ्या  SRPF चा जवान संजय शिंदे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी नगर जिल्ह्यातील सुपे इथून अटक केलीय. मोबाईल लोकेशन ट्रेस करून त्याला पकडण्यात आलंय. मटक्याचे पैसे न दिल्यानं हा वाद झाला आणि त्यातून संजयने नगरबोरी चौक आणि बोरावके नगर इथं गोळीबार केला. त्यात गोपाल शिंदे (रा. वडार गल्ली, दौंड), प्रशांत पवार (रा. वडार गल्ली, दौंड) आणि अनिल विलास जाधव (रा. बोरावकेनगर, दौंड) हे तिघेजण जागीच ठार झालेत.भरदिवसा गोळीबाराचा थरार घडल्याने दौंड शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. संजय शिंदेला अटक करण्यासाठी लोकांचा त्याच्या घराबाहेर मोठा जमाव जमा झाला होता. हल्लेखोर हा राज्य राखीव दलातील जवान आहे. संजय शिंदेला अटक केल्यानंतर दौंडमधला तणाव आता काहिसा निवळला आहे.

Trending Now