कोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार उस्मानाबादचे 'हे' दोन सुपुत्र

कोल्हापूरकरांच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आता उस्मानाबादकरांच्या हाती असणार आहे.

कोल्हापूर, 30 जुलै : कोल्हापूरकरांच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आता उस्मानाबादकरांच्या हाती असणार आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे अतिरिक्त अधीक्षक आणि सोबतच पोलीस अधीक्षकही आता उस्मानाबादचे असणार आहेत. मराठवाड्यातला एक मागास जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख होती पण ही ओळख पुसून आता एकाच जिल्ह्यातले दोन सुपुत्र कोल्हापूरच्या पोलीस दलाचे सर्वेसर्वा असणार आहेत. खरंतर हे एक दुर्मिळ उदाहरणच म्हणावं लागेल. मराठवाड्यातला सर्वात कमी पावसाचा जिल्हा म्हणूनही उस्मानाबादला ओळखले जाते.  दुष्काळाच जोखड कायम वाहणारा हा जिल्हा. मात्र याच जिल्ह्यातून दोन अधिकारी घडले आहेत. आणि आता हे दोघंही कोल्हापूरची कायदा सुव्यवस्था हाताळणार आहेत.FB पोस्ट टाकून तरूणाची रेल्वेखाली आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिल्याचा दावाकोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून अभिनव देशमुख यांची नुकतीच निवड झाली आहे. त्यांचं मुळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील पोहनेर आहे. पण आता ते कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून काम करणार आहेत. तर अतिरिक्त अधीक्षक म्हणून तिरुपती काकडे हे कोल्हापूरमध्ये कार्यरत असणार आहे. तिरुपती काकडे यांचं गाव रुईभर हे आहे.

हेही वाचा...27 दिवसांनंतर संपली मृत्यूशी झुंज, अंधेरी पूल दुर्घटनेतील मनोज मेहता यांचं निधनमराठा आरक्षणाची धग कायम, सोलापूरात आज बंदची हाकVIDEO : ... अन् आनंद आहुजानं सोनमला उचलून घेतलं

Trending Now