Sunanda Pushkar case : शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

Sachin Salve
नवी दिल्ली, 05 जुलै : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय.  दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने थरूर यांना 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केलाय.सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी कोर्टाने शशी थरूर यांना आरोपी म्हणून नमूद केलं होतं. त्यानंतर शशी थरूर यांनी 3 जुलैला अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. थरूर यांचे वकिल विकास पाहवा यांनी अटक करण्यापूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आल्यावर आक्षेप घेतला. तर एसआयटीने तपास पूर्ण झाला असून चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्याची आवश्यकता नाही.सुनंदा पुष्कर यांचा 17 जुलै 2014 रोजी दिल्लीतील एका पंचतारांकित हाॅटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. थरूर यांच्यावर आत्महत्येस प्रवृत करण्याचा आरोप करण्यात आला

3000 पानाच्या आरोपपत्रात पोलिसांनी थरूर यांना एकमात्र आरोपी ठरवलंय. या प्रकरणाची थरूर यांचा नोकर नारायण सिंहला मुख्य साक्षीदार ठरवलंय.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा पुष्कर यांचा मानसिक आणि शारिरिक छळ होत होता. या प्रकरणी अद्याप थरूर यांना अटक करण्यात आली नाही.हेही वाचाहेमंत करकरे यांच्या मृत्यूवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय'नॅनो'चा प्रवास थांबणार ?,जूनमध्ये एकच कार बनली नात्याला काळिमा, आई- बाबा नसताना भावानेच केला 8 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार

Trending Now