गंमत म्हणून मित्रांना पाठवला 'SMS', ओरडा मिळाला म्हणून केली आत्महत्या

तमिळनाडू, 10 सप्टेंबर : तमिळनाडुच्या मदुराईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला झाला आहे. मस्ती-मस्तीमध्ये त्याने एक मेसेज पाठवला आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या मुलाने आत्महत्या केली. आपल्या मित्र-मैत्रिणींशी मस्ती करण्यासाठी एका नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने उद्या शाळेला सुट्टी असल्याचा मेसेज सगळ्यांना पाठवला आणि त्यानंतर असा धक्कादायक प्रकार घडला की त्या विद्यार्थ्याने स्वत:ला फाशी लावून घेतली.पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, हा तरुण निगम विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याने त्याच्या सगळ्या मित्रांना उद्या शाळेला सुट्टी असल्याचा मेसेज पाठवला आणि त्याच्या या मेसेजमुळे तब्बल 50 विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिले. या सगळ्यानंतर शाळेत मोठा गोंधळ उडाला.हा प्रकार कोणी केला असल्याचा शोध शाळा प्रशासनाने घेतला. हा प्रताप या विद्यार्थ्याने केला असल्याचं समजताच प्रशासनाने विद्यार्थीच्या पालकांना शाळेत बोलवलं आणि त्यांना बोल लगावले. त्याच्या मित्रांकडूनही त्याला खूप ओरडा खावा लागला आणि याच सगळ्या नैराश्यातून या विद्यार्थ्याने सोमवारी स्वत:ला फाशी लावून आत्महत्या केली.

आपल्या मुलाच्या अशा जाण्याने त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या सगळ्या गंभीर प्रकारामुळे शाळा परिसरातली मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या संदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून या सगळ्याचा पोलीस आता तपास करत आहे. भारत बंद : गाढवगाडी, रेल रोको, धरपकड आणि घोषणाबाजी

Trending Now