कुठे सुरू झाला 'सॅमसंग'चा जगातला सर्वात मोठा प्रकल्प?

सॅमसंग या विख्यात कंपनीने दिल्लीतल्या नोएडा इथं उभारलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी या प्रकल्पाचं उद्धटना केलं.

नवी दिल्ली,ता.9 जुलै : सॅमसंग या विख्यात कंपनीने दिल्लीतल्या नोएडा इथं उभारलेल्या जगातल्या सर्वात मोठ्या कंपनीचं आज उद्घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी या प्रकल्पाचं उद्धटना केलं. सेक्टर 81 मध्ये हा प्रकल्प उभाण्यात आला असून सॅमसंगने त्यात पाच हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. या कार्यक्रमासाठी मोदी आणि मून यांनी मेट्रोने प्रवास केला.नोएडातला हा प्रकल्प 35 एकरावर पसरला असून सॅमसंग सध्या भारतात वर्षाला 6 कोटी फोन तयार करते. या प्रकल्पानंतर ही संख्या 12 कोटींवर जाणार आहे. मून हे रविवारी भारतात आले असून मंगळवारी त्यांच राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत होणार आहे. मून यांच्यासोबत 100 उद्योगपतींचं शिष्टमंडळही आहे.1990 मध्ये कंपनीनं देशात पहिलं युनिट सुरू केलं होतं. भारतात सॅमसंग चा बाजारपेठेत मोठा हिस्सा असून सॅमसंग लोकप्रियही आहे. या प्रकल्पामुळं तरूणांना मोठ्या प्रमाणावर रोजगारही मिळणार आहे.

सोमवारी सकाळी राष्ट्रपती मून जे इन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट इथं जावून महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्पांजली अर्पण केली. महात्मा गांधी हे सर्व जगासाठी प्रेरणादायी असून जागतिक शांततेसाठी महात्मा गांधींच्या विचारांशिवाय पर्याय नाही असं मून यांनी राजघाटावरच्या संदेश पुस्तिकेत लिहिलं आहे.

 

हेही वाचा...

 संभाजी भिडेंना अटक करा, विरोधीपक्षांची विभानसभेत मागणी

 VIDEO : छगन भुजबळ पुन्हा आक्रमक, विधानसभेत मुनगंटीवारांसोबत जुगलबंदी

 VIDEO : तुळशी तलाव ओव्हरफ्लो, मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

 निर्भयाच्या 3 आरोपींना फाशी कायम, सुप्रीम कोर्टाने फेटाळली फेरविचार याचिका

  

Trending Now